पास व्हायचे तर चल लॉजवर, शिक्षकाची विद्यार्थिनीकडे मागणी

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

पुण्यातील महाविद्यालयातील एका शिक्षकाने आपल्या विद्याथिर्नीला तुला पास करतो, असे आश्वासन देत शरीरसुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाविद्यालयातील शिक्षक संदीप कांबळेविरोधात हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : पुण्यातील महाविद्यालयातील एका शिक्षकाने आपल्या विद्याथिर्नीला तुला पास करतो, असे आश्वासन देत शरीरसुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाविद्यालयातील शिक्षक संदीप कांबळेविरोधात हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Rape

येथील विद्यार्थिनी कला शाखेतील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थिनीने आपल्याला कांबळे या शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याचे सांगितले. त्याबाबत संबंधित विद्याथिर्नीने फिर्याद दिली असून, त्या फिर्यादीनुसार कांबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, संदीप कांबळे हा विद्याथिर्नीला फोन करुन तुला पास करतो असे सांगत होता. त्या बदल्यात त्याने शरीरसुखाची मागणी केली होती. 

त्यास संबंधित विद्यार्थिनीने नकार दिल्याने तुला पास व्हायचे असेल तर तुला माझ्यासोबत लॉजवर यावे लागेल असे सांगितले. सतत होणाऱ्या त्या फोननंतर संबंधित विद्यार्थिनीने त्याचा फोन रेकॉर्ड केला आणि त्यानंतर याबाबतची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर कांबळेविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: Teacher demands girl student for physical Relationship