शिक्षिकेचे अपहरण नव्हे तर प्रेमसंबंध असावेत...

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

एक शिक्षिका शाळा सुटल्यानंतर घरी परतत होती. यावेळी एका मोटारीमध्ये आलेल्या युवकाने फिल्मी स्टाईलने अपहरण केल्याची घटना बिलखौरा येथे घडली आहे,

अलीगढ (उत्तर प्रदेश): एक शिक्षिका शाळा सुटल्यानंतर घरी परतत होती. यावेळी एका मोटारीमध्ये आलेल्या युवकाने फिल्मी स्टाईलने अपहरण केल्याची घटना बिलखौरा येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक शिक्षिका शाळेमध्ये गेली होती. शाळेमधून परतत असताना एकाने मोटार जवळ आणून अपहरण केले. याबद्दलची तक्रार दाखल झाली आहे. परंतु, माहिती घेतली असता शिक्षिकेचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधामधून दोघे पळून गेल्याची शक्यता आहे. दोघांच्याही मोबाईलचे लोकेशन एकाच ठिकाणी आढळले आहे. पण, सध्या दोघांचेही मोबाईल बंद आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

बांकनेर गावामधील प्राथमिक शाळेत शिकवण्याचे काम शिक्षिका करत होती. शाळा सुटल्यानंतर सहशिक्षिकेसह घरी परतत होती. यावेळी एक पांढरी मोटार जवळ आली व शिक्षिकेचे अपहण करण्यात आले. संबंधित शिक्षिका विवाहीत होती. परंतु, तिचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. याबद्दलची माहिती नातेवाईकांही होती. शिक्षिका शाळेत जाताना घरातील रक्कम व सोने घेऊन गेली होती. यामुळे प्रियकरासोबत पळून गेल्याची शक्यता आहे, असेही अधिकाऱयांनी सांगितले.

दरम्यान, शिक्षिकेचे अपहरण झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher missing in love affair police investigation at up