बंगळूर: शिक्षिकेस तीन वर्षांचा कारावास आणि दंडही

विद्यार्थिनीला केलेली शिक्षा भोवली
punished
punished sakal

बंगळूर : दावणगेरी येथील एका खासगी शाळेतील विद्यार्थिनीला कठोर शिक्षा केल्याप्रकरणी न्यायालयाने(Court) शिक्षिकेला तीन वर्षांची सक्तमजुरी(punished) व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतची माहिती अशी, दावणगेरी येथील एका खासगी शाळेतील सात वर्षांच्या विद्यार्थिनीने अभ्यास केला नसल्याच्या कारणावरून २०११ मध्ये एका शिक्षिकेने तिला कठोर शिक्षा केली.

punished
अरविंद केजरीवाल यांच्यावर पंजाब CM चन्नी दाखल करणार मानहानीचा खटला

त्यात तिच्या डाव्या डोळ्याला जखम होऊन तिला त्या डोळ्याची दृष्टी गमवावी लागली होती. याबाबत शिक्षकाविरुध्द प्रकरण दाखल करण्यात आले होते. दावणगेरी येथील तिसऱ्या अतिरिक्त दिवाणी व जेएमएफी न्यायालयात या प्रकरणाची सुनवणी झाली. तुमकुरू येथील एका शाळेत हा प्रकार घडला होता. तेथील शिक्षिकेने १७ फेब्रुवारी २०११ रोजी संबंधित शिक्षा केली होती. त्यात तिच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. वारंवार उपचार करूनही तिची दृष्टी परत येऊ शकली नाही. ती एका मजुराची मुलगी आहे. याप्रकरणी टिळक पार्क पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com