शिक्षक करत होता विद्यार्थीनीला अश्लिल मेसेज अन्...

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

पीडित विद्यार्थीनी महिला सेलमध्ये

उना : एका अल्पवयीन विद्यार्थीनीला शाळेतील शिक्षक अश्लिल मेसेज करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या शिक्षकाकडून अश्लिल मेसेजसह विद्यार्थीनीकडे शरीरसंबंधाची मागणीही केली गेली. याबाबतची तक्रार पीडित विद्यार्थीनीने पोलिसांत दिल्यानंतर संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील उना येथे ही घटना घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिक्षक संबंधित विद्यार्थीनीला व्हॉट्सऍपवरून अश्लिल मेसेज करत होता. त्याच्याकडून अशाप्रकारचे मेसेजेस रात्री उशीरापर्यंत सुरु असायचे. इतकेच नाहीतर त्याने संबंधित विद्यार्थिनीला पैशांचे आमिष दाखवत अश्लिल फोटो पाठविण्यास सांगितले होते. या प्रकाराला कंटाळलेल्या विद्यार्थीनीने तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Image result for whatsapp images

सरकारी नोकरी हवीये? इथं आहेत जागा

याबाबत पीडित विद्यार्थीनीने तक्रारीत सांगितले, की बुधवारी रात्री या शिक्षकाने व्हॉट्सऍपवर अश्लिल मेसेज केला. त्यानंतर त्याने पैशांचे आमिष दाखवत अश्लिल फोटो पाठविण्यास सांगितले. इतकेच नाहीतर या शिक्षकाने शरीकसंबंधाची मागणीही केली.

पीडित विद्यार्थीनी महिला सेलमध्ये

या प्रकरणातील तपास अधिकारी गौरव भारद्वाज यांनी सांगितले, की पुढील कारवाई लवकरच केली जाईल. पोलिसांनी पीडित विद्यार्थीनीला महिला सेल उना येथे पाठविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher send obscene messages to Girl Students in Una