शिक्षक विद्यार्थिनीला म्हणाला 'आय लव्ह यू'; मग काय...

वृत्तसंस्था
Thursday, 20 February 2020

एका शाळेमधील शारिरीक शिक्षण शिकवणऱया शिक्षकाने कागदावर आय लव्ह यू लिहून पाठवले. विद्यार्थिनीने मित्रांना हा प्रकार सांगितल्यानंतर शिक्षकाची धुलाई करण्यात आली. शिवाय, शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

उदयपूर (राजस्थान): एका शाळेमधील शारिरीक शिक्षण शिकवणऱया शिक्षकाने कागदावर आय लव्ह यू लिहून पाठवले. विद्यार्थिनीने मित्रांना हा प्रकार सांगितल्यानंतर शिक्षकाची धुलाई करण्यात आली. शिवाय, शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने घेतला बाईंचा 'किस'...

प्रेम सिंह चूंडावत असे निलंबीत करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चूंडावत हा कुराबड परिसरातील चासदा येथील सरकारी शाळेत शारिरीक शिक्षण शिकवत होता. गेल्या काही दिवसांपासून तो विद्यार्थिनीवर अश्लील कमेंट करत होता. विद्यार्थिनी त्याच्या त्रासाला कंटाळल्या होत्या. त्याने एका विद्यार्थिनीला कागदावर आय लव्ह यू लिहून पाठवले. पीडित विद्यार्थिनीने याबद्दलची माहिती मित्रांना सांगितली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिक्षकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

शिक्षक शिकवताना विद्यार्थ्याने घेतले तिला जवळ अन्...

दरम्यान, विद्यार्थ्यांनी शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची चर्चा गावात पसरली. ग्रामस्थांनी शाळेत येऊन गोंधळ घातला शिवाय शाळेला कुलूप ठोकले. शिवाय, शाळेच्या सर्वच शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली. काही वेळातच शिक्षणविस्तार अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली. शिवाय, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लग्नाच्या तिसऱया दिवशी झाली मुलगी; पतीला धक्का...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher thrashed for misbehaving with girl in school