'पाकिस्तान जिंदाबाद' पोस्ट करणाऱ्या शिक्षिकेस अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

बेळगाव - जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच बेळगाव जिल्ह्यामधील सौंदत्ती तालुक्यातील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलिसांनी त्या शिक्षिकेला अटक केली आहे.

बेळगाव - जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच बेळगाव जिल्ह्यामधील सौंदत्ती तालुक्यातील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलिसांनी त्या शिक्षिकेला अटक केली आहे. त्यानंतर संतप्त जमावाने तिच्या घरावर दगडफेक करत घर पेटविण्याचा प्रयत्न केला.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच शिवापूर (ता. सौंदत्ती) येथील झिजायला ममदापुर नामक शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा  मजकूर व्हाट्सअँप व्हायरल केला होता. त्यामुळे मुरगोड पोलिसांनी शनिवारी ता.16) सायंकाळी तिला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. ही माहिती समजताच संतप्त झालेल्या जमावाने त्या शिक्षिकेच्या घरावर दगडफेक करत घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही माहीती समजताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर यरगट्टी रोडवरही रस्ता रोको करून निदर्शने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The teacher who posted 'Pakistan Zindabad' was arrested