Teachers day 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षकांप्रती व्यक्ती केली कृतज्ञता

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 September 2020

या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या शिक्षकांच्या उल्लेखनिय प्रयत्नांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो, असा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "कठोर परिश्रम करून राष्ट्र घडवण्याच्या कामात आपले योगदान देणाऱ्या शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या शिक्षकांच्या उल्लेखनिय प्रयत्नांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो." माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. एस राधाकृष्णन यांना देखील त्यांनी जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.  
 

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी आपल्या परिश्रमी शिक्षकांप्रती कृतज्ञ आहे. या दिवशी मी आपल्या शिक्षकांच्या उत्कृष्ट प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानतो. दुसऱ्या एका ट्विटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला असून मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये शिक्षकांबद्दल केलेल्या चर्चेचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिक्षकांनी आपल्या गौरवपूर्ण इतिहासाबद्दल मुलांना अवगत करुन दिले आहे. मी शिक्षकांना एक कल्पना सुचवली होती की त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल कमी ज्ञात असणाऱ्या गोष्टी मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teachers day 2020 pm narendra modi pay gratitude to teachers and tribute to dr sarvepalli radhakrishnan