esakal | शिक्षकाचा कान, नाक कापले अन् हातही तोडला
sakal

बोलून बातमी शोधा

teachers nose and ears cut on suspicion of run away married women at rajasthan

शाळेतून घरी निघालेल्या शिक्षकाला काही जणांनी अडवून बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर कान आणि नाक कापले. शिवाय, एक हातही तोडला. गंभरी जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेतील शिक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिक्षकाचा कान, नाक कापले अन् हातही तोडला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): शाळेतून घरी निघालेल्या शिक्षकाला काही जणांनी अडवून बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर कान आणि नाक कापले. शिवाय, एक हातही तोडला. गंभरी जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेतील शिक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा परिसरात आहे.

कासव पुन्हा जिंकले; व्हिडिओ पाहाच...

बाडमेर येथे घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शाळेतून घरी निघालेल्या शिक्षकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शिक्षकाचे नाक व कान कापून टाकण्यात आले. शिवाय, एक हातही तोडला. गंभीर जखमी अवस्थेतील शिक्षकाला उपचारासाठी त्याचे कुटुंबीय अहमदाबाद येथे घेऊन गेले आहेत. बाडमेरच्या रागेश्वरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video: वृद्ध महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन-चार महिन्यांपूर्वी एका विवाहीत महिलेला पळवून नेल्याचा संशय शिक्षकावर होता. पण, दुसऱयाच दिवशी महिला घरी परतली होती. शिक्षकानेच महिलेला पळवल्याचा संशय तिच्या कुटुंबियांनी घेतला होता. संबंधित शिक्षक शाळेत गेला होता. शाळेतून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शिक्षकावर हल्ला केला. यामध्ये कान, नाक कापले आणि एक हात तोडला. शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिक्षकाच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला आहे. संशय व्यक्त केलेले तिघे जण फरार झाले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास करत आहोत.