काश्मिरमध्ये पोलिस गोळीबारात किशोरवयीन मुलीसह दोन ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

काश्मिरमध्ये अांदोलकांनी केलेल्या दगडफेकीला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका किशोरवयीन मुलीसह दोनजण ठार झाले आहेत. ही घटना जम्मू आणि काश्मिरमधील कुलगाम या भागात आज (शनिवार) घडली आहे. 

श्रीनगर- काश्मिरमध्ये अांदोलकांनी केलेल्या दगडफेकीला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका किशोरवयीन मुलीसह दोनजण ठार झाले आहेत. ही घटना जम्मू आणि काश्मिरमधील कुलगाम या भागात आज (शनिवार) घडली आहे. 

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथिल रेडवानी भागात आंदोलकांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला, त्यामध्ये हे तिघेजण मृत्यूमुखी पडले. मृत झालेल्यामध्ये शाकिर अहमद (वय 22), इर्शाद माजिद 20 आणि एका 16 वर्षाच्या किशोरवयीन मुलीचा समावेश आहे. हे सर्व कुलगाम भागातील रहिवाशी आहेत.

या गोळीबारादरम्यान, अन्य दहा आंदोलकही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार चालू असून, एकाची परिस्थिती गंभीर आहे. सध्या या भागात तणाव असल्यामुळे येथिल इंटरनेट सुविधा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

Web Title: Teenage Girl, 2 Others Killed In Kashmir As Forces Fire At Stone Throwers