प्रेमासाठी गर्भवती बहिणीलाच संपवले...

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

बहिणीच्या नवऱयावर तिचे प्रेम जडले. बहिणीचा नवरा असल्याने संसार थाटता येणार नाही, ही सल तिला छळत होती.

जबलपूरः बहिणीच्या नवऱयावर तिचे प्रेम जडले. बहिणीचा नवरा असल्याने संसार थाटता येणार नाही, ही सल तिला छळत होती. गर्भवती असलेली बहिणीचा काटा काढण्याचे तिने ठरवले अन् सपासप बहिणीवर चाकूने वार करून संपवल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे.

शाहपूर नगरमधील कायथरा वस्तीमध्ये 27 जुलै रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. शताक्षी राजपूत (वय 19) असे संशयीत आरोपी युवतीचे नाव आहे. बहिणीच्या नवऱ्याबरोबर विवाह करण्याच्या उद्देशाने तिने गर्भवती बहिणीचा खून केला आहे. शताक्षी हिच्या मोठया बहिणीचे नाव अभिलाषा (वय 27) आहे. शताक्षी ही अभिलाषाच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली होती. अभिलाषा बाथरुममध्ये गेलेली असताना शताक्षीने चाकूने वार करून खून केला. शेजारी राहणाऱ्यांना याबद्दल समजल्यानंतर त्यांनी अभिलाषाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच अभिलाषाचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती बहिणीची हत्या करण्याचा शताक्षीचा हा तिसरा प्रयत्न होता. मेहुण्याच्या प्रेमात पडल्यानंतर त्याच्यासोबत संसार थाटण्यासाठी आपण हा गुन्हा केल्याचे सांगितले. दोन वेळा अभिलाषाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण, काही कारणामुळे जमले नाही. तिसऱया प्रयत्नात खून केला आहे. शताक्षी हिने अभिलाषाचा खून केल्यानंतर स्वतःचा चेहरा झाकून पळून गेली होती. परंतु, पळून जाताना शेजारी राहणाऱयांनि तिला पाहिले होते. अभिलाषाच्या नवऱ्यानेच पोलिसांना शताक्षीचा मोबाइल नंबर दिला. मोबाइल फोनच्या लोकेशनवरुन शताक्षीला शोधून काढले. हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि गुन्ह्याच्यावेळी वापरलेले कपडे जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teenager in love with brother in law kills pregnant sister in Jabalpur with multiple stabs