पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले तहसिलदार; डोक्यावर तांदळाचे पोते 

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

सध्या कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला आहे. या महापूराचा कित्येक जिल्ह्यांना फटका बसला असून, लाखो नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या महापुरात माणूसकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. प्रत्येक जण आपापल्या परीने पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत करत आहे. 

बंगळुरू : सध्या कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला आहे. या महापूराचा कित्येक जिल्ह्यांना फटका बसला असून, लाखो नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या महापुरात माणूसकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. प्रत्येक जण आपापल्या परीने पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत करत आहे. 

दरम्यान, लाखो हात पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पुढे आले आहेत. पूरग्रस्त भागात मदतकार्य जोमाने सुरू आहे. अन्नधान्यापासून ते सर्वच अत्यावश्य वस्तूंची मदत पोचविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनासहस, सरकार, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तीही पुढे येत आहेत.

दरम्यान, कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बेल्थानगडी तालुक्याचे तसहिलदार चक्क स्वत:च्या डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेताना दिसत आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी हे साहेब कुठलाही बडेजाव न मिरवता, आल्या संकटाला सामोरे जाताना स्वत:मधील माणूसकीचे दर्शन जगाला घडवत आहेत. गणपती शास्त्री असे या तहसिलदारांचे नाव असून, एका तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या पुलावरुन ते मार्ग काढत गावातील लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. या संवेदनशील वृत्तीमुळेच नागरिकांना धीर मिळत आहे. या संकटातून सावरायची प्रेरणा व ऊर्जा मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar of Belthangady taluka in Dakshina Kannada district, conducted a rice bag for flood affected people