लालूंच्या मुलाच्या लग्नात खाण्यावरुन राडा

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

लग्नसमारंभ चालू असताना कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ केला. जेवणासाठी धावाधाव केली व लग्नासमारंभातील भांडीही पळवली. या गोंधळात तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यासाठी उभारण्यात आलेला स्टेजही तुटला. एकप्रकारे या समारंभाला कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याने गालबोट लागले.

पटना - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव यांचा विवाह राजदचे आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्यासोबत शनिवारी (ता. 12) झाला. लालूप्रसाद यादव या लग्नाला कारागृहातुन पॅरोलवर आल्याने या लग्नाची चर्चा तर होतीच, परंतु हे लग्न आणखी एका कारणाने कायम चर्चेत राहणार आहे. ते म्हणजे लग्नात कार्यकर्त्यांनी जेवणाच्या वस्तू पळवल्या. या कारणाने लग्न समारंभात मोठा राडाही झाला. 

लग्नसमारंभ चालू असताना कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ केला. जेवणासाठी धावाधाव केली व लग्नासमारंभातील भांडीही पळवली. या गोंधळात तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यासाठी उभारण्यात आलेला स्टेजही तुटला. एकप्रकारे या समारंभाला कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याने गालबोट लागले.

Web Title: in tej pratap marriage uncontrolled crowd looted food