'नो एंट्री फॉर नीतीश चाचा...' - तेजप्रताप यादव

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जुलै 2018

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा मुलगा व तेजप्रताप यादव यांनी आपल्या घराबाहेर 'नो एंट्री फॉर नीतीश चाचा' असा फलक लावणार असल्याचे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

बिहार : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा मुलगा व तेजप्रताप यादव यांनी आपल्या घराबाहेर 'नो एंट्री फॉर नीतीश चाचा' असा फलक लावणार असल्याचे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. हा फलक लालू प्रसाद यादव यांच्या 10, सर्क्युलर रस्त्यावर असलेल्या बंगल्याबाहेर लावला जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली. 

nitish kumar

तेजप्रताप यांनी सांगितले की, नीतीश कुमार यांना आता एनडीएमध्ये असुरक्षित वाटत आहे, तसेच काँग्रेसच्याही काही नेत्यांना बिहारच्या महाआघाडीत परत यायचे आहे त्यामुळे ते आता काँग्रेसशी पुन्हा एकदा युती करण्याचा विचार करतील, पण आमच्याच घराचे दरवाजे बंद असतील तर ते कोणतीही आघाडी करू शकत नाहीत. या आधी तेजप्रताप यांचा भाऊ तेजस्वी यादव यांनी ही अशाच प्रकारचे वक्तव्य करत, आता नीताश कुमार यांना महाआघाडीत परतण्याचे दरवाजे कायमचे बंद असल्याचे सांगितले होते. 

यावेळी तेजप्रताप यांनी सुशील मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. घरी बसून पत्रकार परिषद घेण्याशिवाय त्यांना काही येत नाही. तसेच तेजस्वी वर सारखे आरोप करून काही होणार नाही, आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असेही तेजप्रताप यांनी ठणकावून सांगितले. 
 

Web Title: tejapratap yadav said no entry for nitish chacha board on buglow