तेजस्वी यादव यांनी आखली लक्ष्मण रेषा, RJD नेत्यांना चरणस्पर्श करण्यास बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 tejaswi yadav

तेजस्वी यादव यांनी आखली लक्ष्मण रेषा, RJD नेत्यांना चरणस्पर्श करण्यास बंदी

पाटणा - बिहारमध्ये नितीश सरकारच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रीय जनता दलाच्या कोट्यातील मंत्री वादात सापडले आहेत. मंत्र्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी लक्ष्मण रेखा आखली आहे.

हेही वाचा: सिसोदिया यांना कधीही 'आत' टाकण्याच्या हालचाली

तेजस्वी यांनी आरजेडी मंत्र्यांना सांगितले की कोणीही नवीन वाहन खरेदी करणार नाही. तसेच कोणत्याही कार्यकर्त्याने चरणस्पर्श करू नये. तसेच सर्वांनाप्रामाणिक राहण्याचा आणि सभ्यपणे वागण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शनिवारी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली. त्यात म्हटले की, राजद कोट्यातील मंत्री विभागात स्वत:साठी नवीन वाहने खरेदी करणार नाहीत. त्याचबरोबर त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले कार्यकर्ते, समर्थक किंवा कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या पायांना हात लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. हात जोडून नमसक्रा करण्याच्या सूचनाही केल्या.

हेही वाचा: Nitish Kumar Government : महागठबंधन सरकार बरखास्त करा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

तेजस्वी म्हणाले की, सर्व मंत्र्यांनी सौम्य आणि विनम्र वर्तन करावे. सर्व जाती धर्माच्या लोकांना साधे राहून मदत करा. कोणाकडूनही भेट म्हणून पुष्पगुच्छ किंवा फुलाऐवजी पेन आणि पुस्तक घेण्याची संस्कृती वाढवण्याचा सल्लाही तेजस्वी यादव यांनी दिला.