संघाला बिहारमध्ये मुळे रोवू देणार नाही : तेजस्वी यादव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी 'धार्मिक कट्टरता रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रत्येक ठिकाणी विरोध करण्यात येईल', असे म्हणत संघाला बिहारमध्ये मुळे रोवू देणार नसल्याचा संदेश दिला आहे.

पाटना (बिहार) : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी 'धार्मिक कट्टरता रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रत्येक ठिकाणी विरोध करण्यात येईल', असे म्हणत संघाला बिहारमध्ये मुळे रोवू देणार नसल्याचा संदेश दिला आहे.

यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध धर्मनिरपेक्ष सेवा संघाची (डीएसएस) स्थापना केली आहे. या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना यादव म्हणाले, "आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धार्मिक कट्टरतेचा प्रसार करत देश फोडण्याचे विचार पसरवत आहे. मात्र धर्मनिरपेक्ष सेवा संघ याला विरोध करणार आहे. हा समूह बैठकीमध्ये किंवा खुलेपणाने वापरण्यात येणाऱ्या आणि भाजपकडून समर्थन करणाऱ्या येणाऱ्या आक्षेपार्ह किंवा हिंसक भाषेला सतत विरोध करणार आहे. संघ केवळ हिंदूंचेच समर्थन करतो. ज्यावेळी इतर धर्माच्या मुद्यावर चर्चा करण्याची वेळ येते त्यावेळी संघ आणि भाजपवाले कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. याचाच अर्थ असा की ते दोघेही चुकीच्या गोष्टी असल्या तरीही परस्परांचे समर्थन करतात. संघाचे हे प्रकार चालणार नाहीत आणि मी स्वत: त्याकडे लक्ष देत आहे.'

मागील आठवड्यात तेजस्वी यादव आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेज प्रताप यादव यांनी मिळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बिहारमधील आणि देशातील विकास रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष सेवा संघाची स्थापना केली आहे.

Web Title: Tejasvi Yadav critic on RSS, BJP