तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून बालाजीला 5 कोटींचे दागिने

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तिरुमला मंदिरात गेले. त्यांनी आज सकाळी सपत्नीक दागिने दान केले. तिरुपतीला दान करणाऱया दागिन्यांची छायाचित्रे सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाली आहेत.

हैदराबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज (बुधवार) तिरुमला मंदिराला 5.6 कोटी रुपयांचे दागिने दान केले आहेत. 

बालाजी आणि पद्मावती यांच्यासाठी हे दागिने दिले आहेत. तिरुमला मंदिराने राव यांच्याकडून देण्यात आलेले हे दान ही मंदिरासाठी सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. 5.6 कोटी रुपयांच्या या दागिन्यांमध्ये सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. राव हे मंगळवारी रात्री विशेष विमानाने तिरुमला येथे पोहचले. आज सकाळी त्यांनी पूजा करत सर्व दागिने दान केले.

चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तिरुमला मंदिरात गेले. त्यांनी आज सकाळी सपत्नीक दागिने दान केले. तिरुपतीला दान करणाऱया दागिन्यांची छायाचित्रे सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाली आहेत. राव यांनी यापूर्वीही वारंगल येथील भद्रकालीला 3.65 कोटी रुपयांचे दागिने दान केले होते. 

Web Title: Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao gift to Lord Balaji