ऑफिसमधून तिने केले TikTok अन्.... (Video)

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

सरकारी कार्यालयामध्ये महिलेने व्हिडिओ तयार TikTok या ऍपवर अपलोड केला. काही वेळातच संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

हैदराबादः सरकारी कार्यालयामध्ये महिलेने व्हिडिओ तयार TikTok या ऍपवर अपलोड केला. काही वेळातच संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, कार्यालयीन वेळेत व जागेत हा व्हिडिओ केल्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागले.

तेलंगणाच्या खमाम महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये एक गंमतीशीर व्हिडीओ तयार केला. केएमसीच्या कर्मचाऱ्यांनी या व्हिडीओत गाणे गायले असून, चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचाही उपयोग केला आहे. गंमतीशीर व्हिडिओंचा खजिना असलेल्या TikTok ऍपवर तो अपलोड केला. सोशल मीडियावर काही वेळातच तो व्हिडीओ व्हायरल झाला. केएमसी प्रशासनाने याप्रकरणाची गंभीर दखल घेत कर्मचाऱयांवर कारवाई केली.

केएमसी आयुक्त जे. श्रीनिवासा राव म्हणाले, 'कार्यालयीन वेळेमध्ये त्यांनी सरकारी जागेमध्ये व्हिडिओ तयार केल्याबद्दल व्हिडीओमधील 11 कर्मचाऱ्यांची बदली केली असून, त्यांच्या पगारीतही कपात केली आहे.' दरम्यान, सोशल मीडियावरील या व्हिडीओचे काही जणांनी समर्थन केले आहे, तर काही जणांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या या कृत्याला बेजाबदार म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: telangana government employee made a video and upload in Tiktok