10 रुपयात साडी; मॉलच्या बाहेर चेंगराचेंगरी

वृत्तसंस्था
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

हैदराबाद शहरातील सिद्दीपेट येथील सीएमआर शॉपिंग मॉलमध्ये दहा रुपयांना साडी अशी ऑफर ठेवण्यात आली होती. या ऑफरमुळे महिला ग्राहकांनी या मॉलमध्ये आणि बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हैद्राबाद- हैदराबाद शहरातील सिद्दीपेट येथील सीएमआर शॉपिंग मॉलमध्ये दहा रुपयांना साडी अशी ऑफर ठेवण्यात आली होती. या ऑफरमुळे महिला ग्राहकांनी या मॉलमध्ये आणि बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेत अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती सांगण्यात आली आहे. एका महिलेची तर सोन्याची साखळी आणि 6000 रुपयांची रोकड सोबतच डेबिट कार्डही गेल्याची माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीएमआर शॉपिंग मॉलमध्ये या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Telangana Mall Sees Stampede-Like Situation Over Sarees For R