Telangana : सरदार वल्लभभाई पटेल नसते तर तेलंगना पाकिस्तनचा भाग झाला असता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Telangana

Telangana : सरदार वल्लभभाई पटेल नसते तर तेलंगना पाकिस्तनचा भाग झाला असता!

तूम्ही जगाचा नकाशा पाहताना सर्वच देश तर कसेही फुगलेल्या बेडकासारखे दिसतात. त्यांना काही आकार उकार नाही. सर्वात आखिव रेखीव असलेला देश हा केवळ भारतच दिसतो. आपल्या देशाला इतके रेखीव बनवण्यात कोणाचा हात आहे माहितीय का तूम्हाला? नाही ना?

जगाच्या नकाशात कोरल्यासारखे बारीक काम करून भारताला एकरूप करण्याचे हे महान काम लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आहे. पटेलजींनी केवळ देश जोडला नाही तर माणसेही जोडलीत. देश स्वातंत्र्य झाला आणि भारत पाकिस्तान फाळणीचा विषय सुरू होता. तेव्हा भारताचा आणखी एक संघर्ष करावा लागला. तो म्हणजे देशात अशलेले हुकूमशाही मोडून काढत सर्वांना सामावून घेणे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेले पटेल बॅरिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले होते. पण महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्या मनावर इतका प्रभाव पडला की ते स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग बनले.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात लहान-मोठी ५६२ संस्थानं होती. या संस्थानांचा स्वतंत्र राज्यकारभारावर विश्वास होता आणि हीच विचारसरणी सशक्त भारताच्या उभारणीत सर्वात मोठा अडथळा होता. सरदार पटेल तेव्हा अंतरिम सरकारमध्ये उपपंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री होते. ब्रिटीश सरकारने या संस्थानांना सूट दिली होती की ते स्वेच्छेने भारत किंवा पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात किंवा स्वतंत्रही राहू शकतात.

तर, दुसरीकडे,पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना या संस्थानांना पाकिस्तानात सामील होण्यास प्रवृत्त करत होते. अशा विचित्र परिस्थितीत तत्कालीन वरिष्ठ नोकरशहा व्हीपी मेनन यांच्यासह पटेल यांनी नवाब आणि राजांशी बोलणी सुरू केली. पटेल यांनी खाजगी पत्रांद्वारे संस्थानांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामूळे स्वातंत्र्याच्या दिवसापर्यंत बहुतेक संस्थानांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला होता.

त्यातील जुनागड, हैदराबाद आणि जम्मू-काश्मीर हे नव्हते. त्या काळात हैदराबाद हे देशातील सर्वात मोठे संस्थान होते. त्याचे क्षेत्रफळ इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा जास्त होते. हैदराबादचे निजाम अली खान आसिफ यांनी ठरवले की त्यांचे संस्थान पाकिस्तान किंवा भारतात सामील होणार नाही.

हैद्राबादचा निजाम आणि सैन्यातील वरिष्ठ पदावर मुस्लिम होते. पण सुमारे ८५ टक्के लोकसंख्या हिंदूंची होती. निजामाने 15 ऑगस्ट 1947 रोजी हैदराबादला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले आणि पाकिस्तानकडून शस्त्रे खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर पटेल यांनी ऑपरेशन पोलो अंतर्गत लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय लष्कराने हैदराबादवर हल्ला केला. 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद सैन्याने आत्मसमर्पण केले. त्यामुळेच तेलंगणा भारतात आले. अन्यथा ते पाकिस्तानात गेले असते.