दिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला होती. राधिका दिसायला जेवढी सुंदर तेवढाच मृत्यूही तिच्याबाबत भयंकर होता, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स करत आहेत.

नवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला होती. राधिका दिसायला जेवढी सुंदर तेवढाच मृत्यूही तिच्याबाबत भयंकर होता, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स करत आहेत.

राधिका कौशिक मूळची जयपूरची असून ती गेल्या चार महिन्यांपासून नोएडामध्ये राहत होती. नोएडा सेक्टर 77 मधील अंतरीक्ष फॉरेस्ट अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आज (शु्क्रवार) पहाटेपर्यंत पार्टी सुरू होती. पहाटे 3.30च्या सुमारास राधिकाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. राधिका खाली पडल्यानंतर इमारतीच्या सुरक्षारक्षकाने याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राधिका बरोबर काम करणारा सह अँकर राहुल अवस्थी सुद्धा त्यावेळी फ्लॅटमध्ये उपस्थित होता. परंतु, राधिका पडली त्यावेळी मी बाथरुममध्ये होतो, असे राहुलने सांगितले. राधिकासह आणखी दोन जण या फ्लॅटमध्ये राहतात. पण राधिकाच्या मृत्यूच्यावेळी ते घरामध्ये नव्हते. राधिका आणि तिचा सह अँकर दारुच्या नशेमध्ये असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. शिवाय, घरामध्ये दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. राधिकाची हत्या की आत्महत्या याबाबत पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवाल अद्याप हाती आलेला नाही.'

Web Title: Television anchor Radhika Kaushik found dead in Noida