काश्‍मीर, हिमाचल गारठले

पीटीआय
सोमवार, 28 जानेवारी 2019

श्रीनगर : काश्‍मीरमध्ये थंडीची लाट कायम असून शनिवारीही बहुतांश भागात नीचांकी तापमान नोंदले गेले. राजधानी श्रीनगरमध्ये शनिवारी रात्री उणे 1.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तत्पूर्वी शुक्रवारी हेच तापमान उणे 1.8 अंश सेल्सिअस इतके होते.

दक्षिण काश्‍मीरचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या काझीगुंड येथे उणे 6.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. कोकेनर्ग शहरात उणे 6.9 तर कुपवाडा येथे उणे उणे 6.5 अंश सेल्सिअस इतके होते. लडाख भागात लेह येथे उणे 15.5 अंश सेल्सिअस तर कारगिल येथे उणे 20.7 इतके नोंदले गेले. कारगिल हे जम्मू-काश्‍मीरमधील सर्वात थंड ठिकाण मानले जाते. 

सिमला, डलहौसी, कुफ्रीत हिमवृष्टी 

हिमाचलमध्ये अनेक पर्यटनस्थळी हिमवृष्टी सुरू असल्याने परिसर बर्फच्छादित झाला आहे. गेल्या चोवीस तासांत डलहौसी येथे 10 सेंटिमीटर, कुफ्री येथे 8 सेंटिमीटर, चायल येथे 8 सेंटिमीटर आणि सिमला येथे 5.6 सेंटिमीटर हिमवृष्टीची नोंद झाली.

कल्पा आणि केलॉंग येथे अनुक्रमे 12.4 आणि 8 सेंटिमीटर हिमवृष्टीची नोंद झाली. याशिवाय राज्यातील अनेक भागात 1.6 मिलिमीटर ते 7 मिलिमीटर इतकी बर्फवृष्टी झाली. मनालीत उणे 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperature Decreased in Kashmir and Himachal