कर्नाटकात मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले; विहिंप-बजरंग दल आक्रमक

Mangalore
Mangaloreesakal
Summary

मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालं आहे.

सध्या देशात हनुमान चालिसा, भोंगा, ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Masjid) वाद सुरु असतानाच आता कर्नाटकातील (Karnataka) जुमा मशिदीखाली (Juma Masjid) मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात आलाय. यानंतर विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि बजरंग दलाचे (Bajrang Dal) कार्यकर्ते आक्रमक झाल्याने या भागात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

कर्नाटकातील मंगळुरूपासून (Mangalore) काही अंतरावर मलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचं काम सुरूय. 21 एप्रिल रोजी डागडुजीदरम्यान मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले. हे अवशेष सापडल्यामुळं पूर्वी या ठिकाणी हिंदू मंदिर होते, असा दावा केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडं यासंदर्भात धाव घेतली असून, कागदोपत्री सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय या ठिकाणचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केलीय.

Mangalore
प्रतापगडावर शीघ्र कृती दल दाखल; अफजल खान कबर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त

हा वाद न्यायालयामध्ये पोहोचला असून न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत डागडुगीचं काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालं आहे. दरम्यान, विहिंप आणि बजरंग दलाच्या मागणीनंतर प्रशासनानं तातडीनं या जमिनीसंदर्भातील कागदोपत्री पडताळणी सुरू केली असून लोकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. जमिनीची नोंद ठेवणारा विभाग आणि वफ्फ बोर्डाकडून माहिती घेणार आहोत, असं दक्षिण कानडाचे उपायुक्त राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com