मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येणारा कुकरचा टेम्पो जप्त

संजय सूर्यवंशी
शनिवार, 31 मार्च 2018

शुक्रवारी रात्री विश्वेश्वय्यानगर मधील जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरून टेम्पो जात होता. काही लोकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही माहिती निवडणूक अधिकार्‍यांना दिली. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा टेम्पो अडविला तेव्हा त्यामध्ये निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वस्तू असल्याचा संशय आला.

बेळगाव : मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येणाऱ्या कुकरचा टेम्पो जप्त केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यामध्ये बेळगाव ग्रामीण मधील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव व छायाचित्र असलेले कुकरचे बॉक्स आढळून आले आहेत.

शुक्रवारी रात्री विश्वेश्वय्यानगर मधील जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरून टेम्पो जात होता. काही लोकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही माहिती निवडणूक अधिकार्‍यांना दिली. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा टेम्पो अडविला तेव्हा त्यामध्ये निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वस्तू असल्याचा संशय आला.  त्यामुळे त्यांनी तो पकडून ठेवला, तर टेम्पो चालक फरारी झाला.

आज सकाळी अधिकाऱ्यांनी जाऊन त्याची पाहणी केली तेव्हा कुकरच्या बॉक्सवर लक्ष्मी हेब्बाळकर यांचे छायाचित्र व नाव असल्याचे दिसून आले. पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे शेकडो कुकर असून येथेच गोडाऊन असण्याची शक्यताही व्यक्त केली. पुढील कायदेशीर कारवाई व तपास निवडणूक अधिकारी व पोलिसांकडून सुरू आहे. 

Web Title: tempo seized on belgaum police