अजगराने गळ्याला विळखा घातला पण....

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

दहा फूट लांब अजगराने ५८ वर्षीय भुवचंद्रन नायर यांच्या गळ्याला विळखा घातला. सुमारे १५ मिनिटाच्या अथक प्र्रयत्नाने लोकांनी त्यांची मान अजगराच्या विळख्यातून सोडवली.

तिरुवनंतपुरम : अजगर म्हटले की काेणीही कितीही शक्तीशाली असले की घाबरते. बऱ्याचदा अजगर किंवा साप समाेर आला की आपली भंबेरी उडते काय करावे ते सुचत नाही. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये घडला आहे.

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे दहा फूट लांब अजगराने ५८ वर्षीय भुवचंद्रन नायर यांच्या गळ्याला विळखा घातला. सुमारे १५ मिनिटाच्या अथक प्र्रयत्नाने लोकांनी त्यांची मान अजगराच्या विळख्यातून सोडवली.

मिळालेल्या माहितीनुसार, मनरेगा योजनेवर सरकारी महाविद्यालयातील झाडे कापण्याच्या कामावर ५५ मजूर काम करत होते. यात नायर यांचाही समावेश होता. दरम्यान त्यांचे लक्ष दहा फूट लांब अजगरावर पडले. नायर मागे हटले पण अजगराने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याने मानेलाच विळखा घातला होता. दरम्यान, अन्य मजूर नायर यांच्या मदतीला धावले. अजगराला एका पोत्यात बांधून त्याला वन विभागाच्या हवाली करण्यात आले. यातून ते बालबाल बचावले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten foot python attack on person