जगभरातील दहा लाख महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने त्रस्त

पीटीआय
मंगळवार, 29 मे 2018

महिलांच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण 
जागतिक पातळीवर गर्भाशयाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूपैकी एक तृतीयांश मृत्यू भारतात होतात. भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे दरवर्षी 1 लाख 32 हजार प्रकरणे समोर येतात आणि या उपचारादरम्यान 74 हजार जणांचा मृत्यू होतो. गर्भाशयाच्या कर्करोगाने महिलांचा मृत्यू होणे हे स्तनाच्या कर्करोगानंतरचे दुसरे प्रमुख कारण मानले जाते. 

कोलकता : जगभरातील सुमारे दहा लाखांहून अधिक महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. मध्यम उत्पन्न गटातील देशातील महिलांत गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

महिलांत सर्वसाधारणपणे आढळून येणारा ह्यूमन पेपीलोमा व्हायरस (एचपीव्ही) हा लवकर बरा होतो; मात्र गंभीर रूप धारण केल्यानंतर त्याचे रूपांतर गर्भाशयाच्या कर्करोगात होते. एका सर्वेक्षणात 16 ते 30 वयोगटातील (चौदा टक्के) महिलांत एचपीव्हीचे प्रमाण उच्च पातळीवर असल्याचे आढळून आले असून, त्यात गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्‍यता अधिक असल्याचे म्हटले आहे. गर्भाशयाचा कर्करोग हा धूम्रपान, असुरक्षित शारीरिक संबंध, अनेक बाळंतपण, गर्भनिरोधक गोळ्यांचे दीर्घकाळ सेवन तसेच एचआयव्ही आणि एचपीव्ही संक्रमणामुळे होत असल्याचे सांगितले

भारताची स्थिती 

महिलांच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण 
जागतिक पातळीवर गर्भाशयाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूपैकी एक तृतीयांश मृत्यू भारतात होतात. भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे दरवर्षी 1 लाख 32 हजार प्रकरणे समोर येतात आणि या उपचारादरम्यान 74 हजार जणांचा मृत्यू होतो. गर्भाशयाच्या कर्करोगाने महिलांचा मृत्यू होणे हे स्तनाच्या कर्करोगानंतरचे दुसरे प्रमुख कारण मानले जाते. 

Web Title: Ten million women worldwide suffer from uterine cancer