काँग्रेसचे दहा आमदार होते भाजप प्रवेशास इच्छुक

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

- काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट होता भाजपमध्ये विलीन करण्यास इच्छुक.

पणजी : काँग्रेसचे दहा आमदार नुकतेच फुटले होते. या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यासही तयार होता. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाने त्यास मान्यता दिली नाही, असे गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आज (बुधवार) सांगितले. 

गोव्यातील भाजप कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत तेंडुलकर बोलत होते. तेंडुलकर म्हणाले, काँग्रेसचे दहा आमदार फुटले होते. या आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यात तयार होता. पण पक्ष नेतृत्त्वाला हे मान्य नव्हते. आम्हाला कोणताही पक्ष अस्थिर करायचा नाही.  

दरम्यान, तेंडुलकर यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसकडूनही याबाबत आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले, की आमदार फोडण्यासाठी भाजपने कोट्यवधींची रक्कम आमदारांना दिली. याबाबतचे पुरावेही आमच्याकडे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten MLA of Congress are Interested to Enter BJP Party says Vinay Tendulkar

टॅग्स