"आयआयएम'च्या दहा नव्या संचालकांची नियुक्ती

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज दहा "आयआयएम'च्या संचालकांची नियुक्ती केली असून, यामध्ये "आयआयएम बंगळूर'
चाही समावेश आहे. प्रो. जी. रघुराम हे आयआयएम बंगळूरचे संचालक असतील, असे कार्मिक मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. रघुराम हे 1985 पासून आयआयएम- अहमदाबादमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सप्टेंबर 2013 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांनी अधिष्ठाता म्हणूनही काम केले.

रघुराम हे सध्या "आयआयएम अहमदाबाद'मध्ये "पब्लिक सिस्टीम ग्रुप'चे अध्यक्ष आहेत. आयआयएम रांची आणि रोहतकच्या प्रमुखपदी अनुक्रमे शैलेंद्र सिंह आणि धीरज शर्मा यांची, तर आयआयएम रायपूरच्या प्रमुखपदी भरत भास्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयआयएम संबळपूरची धुरा महादेव प्रसाद जैस्वाल, तर आयआयएम नागपूरची सूत्रे एल. एस. मूर्ती हे सांभाळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुढील पाच वर्षांसाठी या नियुक्‍त्या केल्या आहेत.

Web Title: ten new director on iim