उत्तर प्रदेशात पावसामुळे दहा जणांचा मृत्यू 

Ten people died due to rains in Uttar Pradesh
Ten people died due to rains in Uttar Pradesh

लखनौ (पीटीआय) : उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत पावसामुळे दहा जणांचा मृत्यू झाला, तर अन्य सात जण जखमी झाले आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करून पाण्याने वेढलेल्या घरांची पाहणी करून तेथील नागरिकांना सुरक्षितपणे हलविण्याच्या सूचना सर्व जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

उत्तर प्रदेशात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये कालपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून, अन्य सात जण बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत मृतांची संख्या 80 झाली होती. त्यात आज सकाळी साडेअकरापर्यंत वाढून 84 वर गेली आहे, असे मदत आणि बचाव कार्य करणारे आयुक्त संजय प्रसाद यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात सहारणपूर जिल्ह्यात पावसामुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे 44 जनावरे मरण पावली असून, 451 घरांचे नुकसान झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. 
पावसामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी आर्थिक आणि वैद्यकीय मदत दिलेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com