मोदींच्या भाषणादरम्यान मंडप कोसळून 22 जखमी

Tent collapses during PM Modi's Midnapore rally
Tent collapses during PM Modi's Midnapore rally

मिदनापूर (पश्चिम बंगाल): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळल्याने 22 हून अधिक जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) घडली. जखमींना मिदनापूरच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीत भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, सभा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जखमींची चौकशी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. भाषण सुरु असतानाच अचानक मंडप कोसळला. मंडप कोसळल्याचे पाहून घटनास्थळी मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजीच्या जवानांनी मंडपाखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. भाषण संपताच मोदी थेट मिदनापूर रुग्णालयात गेले. मोदी यांचे भाषण सुरू असतानाच मंडप कोसळला आणि एकच धावपळ उडाली. पावसामुळे मैदान ओलसर झाले होते. पळापळीत अनेकांच्या चपला चिखलातच रुतून बसल्या होत्या. सभेच्या ठिकाणी गर्दी वाढल्याने मंडप कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्‌विट करत, जखमींना संपूर्णपणे वैद्यकीय सुविधा पुरवली जात असल्याचे म्हटले आहे. जखमी नागरिक लवकरात लवकर बरे होवोत, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com