कॉंग्रेसमुळेच देशात दहशतवाद फोफावला- योगी अदित्यनाथ

 कॉंग्रेसमुळेच देशात दहशतवाद फोफावला- योगी अदित्यनाथ

भवानीपटणा (ओडिशा) ः पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारच्या अनुनयाच्या धोरणामुळेच देशात दहशतवाद फोफावला असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भारत सुरक्षित राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपच्या बैठकीत बोलताना योगी म्हणाले की, सर्वांच्या सक्रिय सहकार्याने दहशतवादाचे नामोनिशाण मिटविण्याचा निश्‍चय राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्राने कठोर पावले उचलली असून त्यावरून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देत त्यांच्या वाईट हेतूंचा नाश करेल, याबद्दल खात्री पटते.

"पूर्वी दहशतवादी गोळीबार करेपर्यंत सुरक्षा दलांना प्रतीक्षा करण्यास सांगण्यात येत असे, असे टीकास्त्र त्यांनी कॉंग्रेसवर सोडले. दहशतवादी जसे कोणासाठीही थांबत नाही, तसे कोणासाठीही थांबू नका, असे निर्देश भाजपने सत्तेवर आल्यानंतर सुरक्षा दलांना दिले आहे, अशा शब्दात केंद्र सरकारचे कौतुक योगींनी केले. 

देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होण्याची खात्री जनतेने करावी.- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com