दहशतवाद थांबला तरच चर्चा यशस्वी - मेहबूबा मुफ्ती

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - काश्‍मीर समस्येबाबत भारतासोबतची चर्चा यशस्वी व्हावी असे वाटत असेल तर पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा, अशा कानपिचक्‍या जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज दिल्या. राज्यामध्ये अस्थिरता असताना द्विपक्षीय चर्चा शक्‍य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अटलबिहारी वाजपेयी यांचा वारसा पुढे न्यायचा असल्याने भारत- पाक चर्चेबाबत आपण आशावादी आहोत, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. 
 
काश्‍मीर खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये पाकिस्तानची मोठी भूमिका आहे, यासाठी त्यांनी दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवावे. घुसखोरी आणि चकमकी या सीमावर्ती भागामध्ये होतात, ही बाब आता लपून राहिलेली नाही. आपल्या हद्दीतून दहशतवाद्यांनी घुसखोरी करू नये म्हणून पाकिस्तानने सावध राहायला हवे, असेही त्यांनी सांगितले. काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादाच्या कारवाया कमी झाल्या तर दोन्ही देशाला व्यापाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यानंतर होणारी चर्चाही यशस्वी ठरेल, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. काश्‍मीर खोऱ्यातील हिंसाचारावरदेखील त्यांनी चिंता व्यक्त केली. 

तरुणांना मुख्य प्रवाहात आणा 
आपली घरेदारे सोडून दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणायला हवे. त्यासाठी राज्यातील पोलिसांनी पुढाकार घ्यायला हवा. असे मतही मेहबूबा यांनी मांडले. दहशतवादी संघटनांमध्ये भरती झालेले किंवा भरती होऊ पाहणारे तरुण हे स्थानिक आहेत. या तरुणांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या हातामध्ये बंदुकीऐवजी बॅट, बॉल आणि चांगले शिक्षण द्यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: terrorism stopped discussions successful