काश्मीरात 'टार्गेट किलिंग' कट उध्दवस्त; अल्पवयीन दहशतवादी अटकेत

ईदगाहमध्ये छापा टाकून दहशतवाद्याला पकडले. पकडलेला दहशतवादी हा अल्पवयीन आहे.
 terrorists in Tral, Kashmir gunned down in encounter with security forces
terrorists in Tral, Kashmir gunned down in encounter with security forcesEsakal

श्रीनगर: श्रीनगरमध्ये (Srinagar) टार्गेट किलिंग करण्यासाठी आलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) च्या अल्पवयीन दहशतवाद्याला (Terrorist) पोलिसांनी काल (ता.१९) अटक केली. दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या (Kashmir) पुलवामामध्ये (Pulwama) जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) च्या कार्यकर्त्याला सुरक्षा दलांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे हिट स्क्वॉड म्हणून ओळखले जाणारे टीआरएफ हे निरपराध काश्मीर नागरीकांची हत्या करण्याचा कट रचत होते. याची माहिती पोलिसांनी लागली. यानुसार त्यांनी पाळत ठेवली होती.तर काही भागात नाक्यावर पाळत ठेवली होती. दरम्यान, पोलिसांना ईदगाह परिसरात दहशतवादी दिसल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी पोलिसांनी ईदगाहमध्ये छापा टाकून दहशतवाद्याला पकडले. पकडलेला दहशतवादी हा अल्पवयीन आहे. त्याचे वय १७ वर्ष आहे. त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन मॅगझिन आणि २१ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, त्याला त्याच्या हँडलरने श्रीनगरमध्ये टार्गेट किलिंग करण्यासाठी बोलावले होते.

Summary

लष्कराचे हिट स्क्वॉड म्हणून ओळखले जाणारे टीआरएफ हे निरपराध काश्मीर नागरीकांची हत्या करण्याचा कट रचत होते.

 terrorists in Tral, Kashmir gunned down in encounter with security forces
Srinagar Encounter : आंदोलन करणाऱ्या नातेवाईकांना हटविले

पुलवामा येथून मिळालेल्या माहितीनुसार, काल पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक केली. त्याचे नाव इरफान युसूफ दार असे आहे. त्याच्याकडून एक असॉल्ट रायफल, एक मॅगझीन आणि ३० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलांना पाहताच त्याने गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला आणि पकडला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com