पुलवामात दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांवर हल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

जम्मू काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अल्पसंख्याक समुदायाच्या संरक्षणासाठी तैनात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. मात्र, यात कोणतीही जीवित अथवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.

श्रीनगर -  जम्मू काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अल्पसंख्याक समुदायाच्या संरक्षणासाठी तैनात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. मात्र, यात कोणतीही जीवित अथवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.

पुलवामा जिल्ह्याच्या तहाब भागातील सैदपोरा येथे आज दुपारी दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक समुदायाच्या छावणीवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्याच्याद्वारे सुरक्षारक्षकांकडील शस्त्रात्रे काढून घेण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Terrorist attack in Pulwama