दहशतवादी कसाब उत्तर प्रदेशचा रहिवासी 

दहशतवादी कसाब उत्तर प्रदेशचा रहिवासी 

नवी दिल्ली : मुंबई हल्ल्यात फासावर लटकवलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या नावाचा रहिवासी दाखला उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातून दिला गेला असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. चौकशीनंतर दाखला बनावट असल्याचे उघडकीस आले. तहसीलदारांच्या आदेशानंतर हा दाखला रद्द करण्यात आला असून, लेखापालाला निलंबित केले आहे. त्याच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. 

कसाबच्या नावाचा रहिवासी दाखला औरेया जिल्ह्यातील बिधुना तहसील कार्यालयातून देण्यात आला आहे. या दाखल्यात कसाबचे जन्मस्थान बिधुनातील आंबेडकरनगर असे दर्शविण्यात आले आहे. हा दाखला 21 ऑक्‍टोबर 2018 मध्ये तयार केला होता. दाखल्यावर त्याचे छायाचित्रही प्रसिद्घ होते, तरी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष त्याकडे गेले नाही. दाखला तयार करण्यापूर्वी कसाब नागरिकत्वाची शहानिशाही त्यांनी केली नाही. कसाबच्या वडिलांचे नाव मोहम्मद आमीर तर आईचे नाव मुमताज बेगम असे लिहिले होते.

कसाबच्या आईचे खरे नाव नूर इलाही आहे. उत्तर प्रदेशमधील सरकारी कार्यालयात पैसे देऊन कोणाचेही बनावट दाखले तयार करता येतात, अशी माहितीही चौकशीत देण्यात आली. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यात पकडला गेलेला दहशतवादी कसाब हा एकमेव जिवंत आरोपी होता. त्याला त्याला 2012मध्ये पुण्यातील कारागृहात फाशी देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com