जम्मू काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा

terrorist Killed After Attack On Police Post In Kashmir
terrorist Killed After Attack On Police Post In Kashmir

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज पोलिसांनी एका दहशतवाद्याला ठार केले. दक्षिण काश्‍मीरमधील अछबल येथे शुक्रवारी रात्री ही चकमक झाल्याचे पोलिसांच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे. या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव बिलाल अहमद असे असून, तो कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वीच तो "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता.

दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागामध्ये दहशतवाद्याने एका नागरिकाला गोळ्या घालून ठार मारले. बोमोई परिसरामध्ये ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com