हंदवाडामध्ये दहशतवाद्याचा खात्मा; पाकिस्तानी नोटा जप्त

वृत्तसंस्था
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, त्याच्याकडून एके 47 बंदुक, ग्रेनेड आणि पाकिस्तानी चलनातील नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे आज (रविवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्याकडून स्फोटके आणि पाकिस्तानी चलनातील नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंदवाडातील हजीन भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शोधमोहिम राबविण्यात येत असताना दहशतवाद्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात दहशतवादी ठार झाला. अद्याप काही दहशतवादी या परिसरात असल्याची शक्यता आहे.

या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, त्याच्याकडून एके 47 बंदुक, ग्रेनेड आणि पाकिस्तानी चलनातील नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: Terrorist killed in encounter in J&K's Kupwara