काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारा दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

जम्मू: नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न उधळून लावत जवानांनी आज (मंगळवार) एका दहशतवाद्याला ठार मारले.

जम्मू काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुंदरबानी सेक्‍टरमध्ये ही कारवाई करण्यात आली. या भागात तैनात असलेल्या जवानांना दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नांत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने दहशतवाद्यांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या चकमकीमध्ये जवानांनी एका दहशतवाद्याला ठार मारले, तर इतर जण पाकव्याप्त काश्‍मीरच्या दिशेने पळून गेले, असे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद्याचे शव आणि शस्त्रास्त्रे जवानांनी ताब्यात घेतली आहेत.

Web Title: terrorist killed in jammu-kashmir