कुपवाडा येथे दहशतवादी शोधमोहिम सुरू

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - दोन किंवा तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने लष्कर आणि पोलिसांनी कुपवाडा जिल्ह्यातील कंडी येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम सुरू केली आहे.

श्रीनगर - दोन किंवा तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने लष्कर आणि पोलिसांनी कुपवाडा जिल्ह्यातील कंडी येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम सुरू केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातून गोळीबाराचा आवाज आला आहे. मात्र चकमक सुरू आहे किंवा नाही याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. दहशतवादविरोधी पथक शुक्रवारी माचील सेक्‍टरमध्ये दाखल झाले. उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक'नंतर दहशतवाद्यांची कारवाया वाढल्या असून पाकिस्ताननने अनेकदा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. "सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानने आतापर्यंत साधारण 45 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला असून त्यापैकी चार वेळा शनिवारी शस्त्रसंधीचा भंग केला.

नियंत्रणरेषेजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शनिवारी पंजाब रेजिमेंटमधील मनदीपसिंह नावाचे जवान हुतात्मा झाले. दहशतावाद्यांनी पळून जाताना त्यांच्या पार्थिवाची विटंबना केली. या घटनेचा देशभर निषेध करण्यात येत असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या प्रकाराबद्दल पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे आश्‍वासन दिले आहे.

Web Title: Terrorist search operation started in Kupwada