दहशतवाद्यांकडून आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जुलै 2018

काश्मीरमध्ये शुक्रवारी (ता. 27) एका पोलिसाचे अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री काश्मीरच्या त्राल येथून या पोलिस अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

जम्मू : काश्मीरमध्ये शुक्रवारी (ता. 27) एका पोलिसाचे अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री काश्मीरच्या त्राल येथून या पोलिस अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुदासीर अहमद असे या अपहरण झालेल्या पोलिसाचे नाव आहे. ते अवंतीपुराच्या राशीपुरा येथे तैनात होते. अहमद यांच्या कुटुंबीयांनीही ते रात्रीपासून गायब असल्याचं सांगितले आहे. मात्र भारतीय लष्कराने त्याला अद्याप दुजोरा दिला नसून अहमद यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

गेल्या दोन महिन्यातील अशा प्रकारची ही चौथी घटना आहे. या आधी दहशतवाद्यांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल सलीम शहा यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तर ६ जुलै रोजी दहशतवाद्यांनी पोलिस शिपाई जावेद अहमद डार यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. तसेच, शिपाई औरंगजेबाचे अपहरण करुन हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती.

Web Title: Terrorists abduct another policeman from Jammu and Kashmir