काश्‍मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला

पीटीआय
शनिवार, 1 एप्रिल 2017

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू दौऱ्याच्या एक दिवसअगोदर दहशतवाद्यांनी काश्‍मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला केला. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास श्रीनगर-बारामुल्ला मार्गावर लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराने संपूर्ण परिसरात कसून शोध सुरू केला आहे. 

श्रीनगर-बारामुल्ला मार्गावर लष्कराचा ताफा आज दुपारी एकच्या सुमारास बेमिना परिसरात जेव्हीसी रुग्णालयाजवळून जात असताना दोन-तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनी चोख उत्तर दिले. या वेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले.

जखमी जवानांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर बेमिनाच्या अनेक भागात नाकेबंदी करत छापेमारी सुरू केली; परंतु दहशतवाद्यांचा थांगपत्ता लागला नाही. जवानांच्या ताफ्यावर लपलेल्या दहशतवाद्यांनी लक्ष्य करत गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराची दोन वाहने सापडली. लष्कराच्या अन्य वाहनांनी त्याचवेळी दहशतवाद्यांना उत्तर दिले; मात्र दहशतवादी सापडले नाहीत. 

श्रीनगर बाजारात गोळीबार 
दरम्यान, बेमिना हल्ल्यापूर्वी अर्धातास अगोदर श्रीनगरच्या लाल चौक भागात गोळीबाराची घटना घडली. मैसूमा भागात ताज हॉटेलमध्ये एक संशयित युवक एका खोलीत अचानक घुसला. त्यामुळे हॉटेलमध्ये गोंधळ उडाला.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला पकडले; मात्र स्थानिकांना तो दहशतवादी किंवा दगडफेक करणारा युवक असल्याचे वाटले. त्यांनी पोलिसांना विरोध केला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

त्या संशयिताला पोलिस ठाण्यात नेले असता लाल चौक परिसरातील स्थिती चिघळली. काही युवकांनी दगडफेक लगेच सुरू केली; परंतु कालांतराने परिस्थिती नियंत्रणात आली. हॉटेलमध्ये घुसलेला युवक मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Terrorists attack Indian Army convoy in Srinagar, ahead of PM Narendra Modi's Kashmir visit