दहशतवाद्यांच्या ठिकाणी सापडले चीनचे झेंडे

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराने बारामुल्ला येथे सुरू केलेल्या शोध मोहिमेदरम्यान चीनचा झेंडा आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून 44 जणांना अटक करण्यात आली आहे.

काल सुरक्षा दलाने बारामुल्ला जिल्ह्यात काल 700 घरांवर छापे टाकले. त्यात दहशतवाद्यांशी संबंधित 44 जणांना अटक करण्यात आली, असे लष्कराच्या प्रवक्‍त्याने येथे सांगितले.

लष्कराने येथील परिसराची घेराबंदी करीत शोधमोहीम उघडली होती. या वेळी लष्कराने पेट्रोल बॉंब, चीन आणि पाकिस्तानचे झेंडे, लष्कर ए तैयबा आणि जैश ए महंमदची पत्रके, मोबाईल्स आणि देशविरोधी प्रचार सामग्री जप्त करण्यात आली. काश्‍मीर खोऱ्यातील क्वाझी हमम, गनाइ हमाम, तविद गुंज, जामिआ आणि अन्य भागात ही शोध मोहीम लष्कर, पोलिस, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने राबविली, असे या प्रवक्‍त्याने सांगितले.

Web Title: Terrorists found in China flags