हवाईदलाच्या तळांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट?

हवाईदलाच्या तळांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट?

श्रीनगर : काश्मीरमधील श्रीनगर आणि अवंतीपुरा या हवाई दलाच्या तळांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली आहे. या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हायअलर्ट जारी केला आहे. 

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला करण्याचे षड्यंत्र मागील काही दिवसांपासून रचण्यात येत आहे. हवाई दलाच्या श्रीनगर आणि अवंतीपुरा हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

दरम्यान, पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये काल (गुरुवार) भीषण चकमक झाली. त्यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com