भारतात घुसखोरीसाठी दहशतवादी सज्ज : वैद

पीटीआय
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

विजयपूर (जम्मू-काश्‍मीर) : जम्मू-काश्‍मीरमध्ये घुसखोरीसाठी सीमेपलीकडे मोठ्या प्रमाणात सशस्त्र दहशतवादी सज्ज असल्याची माहिती जम्मू-काश्‍मीरचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी दिली. मात्र, सीमेवर लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाची करडी नजर असून, घुसखोरीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दिलासाही त्यांनी दिला. 

खोट्या प्रचारातून जम्मू-काश्‍मीरमधील युवकांना दहशतवादाकडे वळविण्यासाठी पाकिस्तानचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत, पण पोलिसांचे त्यावर लक्ष असून, असा खोटा प्रचार करणारी अकाउंट बंद करण्यात आल्याचे वैद यांनी सांगितले. पोलिस तांत्रिक प्रशिक्षण केंद्राच्या दीक्षान्त कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आजच्या दीक्षान्त कार्यक्रमातून 215 जवान पोलिस दलात दाखल झाले. सीमेपलीकडून भारतात घुसण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचा गुप्तचर विभागाने कळविले आहे. तथापि, लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाची करडी गस्त असल्यामुळे घुसखोरीचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे वैद म्हणाले. 

सोशल मीडियातून पाकिस्तान करीत असलेला खोटा प्रचार रोखण्यासाठी पोलिसांनी जिल्हा पातळीवर 26 फेसबुक पेजेस आणि 31 ट्विटर हॅंडल सुरू केल्याची माहितीही देतानाच, हिंसाचार सोडून स्थानिक युवक मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत, ही चांगली बाब असल्याचे वैद यांनी सांगितले. 

Web Title: Terrorists ready for infiltration in India says Vaid