दहतवाद्यांनी पळवली पोलिसांची रायफल; 1 ताब्यात

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

श्रीनगर : दोन संशयित दहशतवाद्यांनी एका पोलिसाची AK-47 बंदुक हिसकावल्याची घटना आज (रविवार) सकाळी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात घडली. त्यापैकी एका दहशतवाद्याने बंदुक घेऊन पोबारा केला, तर दुसऱ्याला पकडण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आले. 

बारामुल्ला जिल्ह्यातील तावी पुलाजवळ आज पहाटेच्या वेळी ही घटना घडली. प्रशासनाने जम्मू आणि भवतालच्या परिसरात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. या धरपकडीमध्ये एक पोलिस जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याला उपचारांसाठी नजीकच्या एका सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

दरम्यान, पळून गेलेल्या एका दहशतवाद्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याची कसून चौकशी करण्यात येत असून, त्यानुसार पुढील तपास करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.  
 
Web Title: terrorists snatch AK-47 rifle from Jammu Kashmir police