आयईडीच्या स्फोटासाठी चोरीप्रतिबंधक रिमोटचा वापर

आयईडीच्या स्फोटासाठी चोरीप्रतिबंधक रिमोटचा वापर

नवी दिल्ली ः जम्मू आणि काश्‍मीरमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चोरीप्रतिबंधक रिमोटचा वापर शक्तिशाली विस्फोटकांचा (आयईडी) स्फोट घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही अशाच प्रकारची यंत्रणा वापरण्यात आली होती, असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. 

शक्तिशाली विस्फोटकांचा स्फोट घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन, वॉकी-टॉकी सेट आणि वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या चोरीप्रतिबंधक रिमोटचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षीपासून दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणण्यासाठीच्या कार्यपद्धतीमध्ये अचानक बदल केला असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com