Coronavirus : ५० कोटी लोकांची होणार मोफत तपासणी; केंद्र सरकारचा निर्णय

Testing treatment free for Ayushman Bharat beneficiaries at pvt labs empanelled hospitals
Testing treatment free for Ayushman Bharat beneficiaries at pvt labs empanelled hospitals

नवी दिल्ली : मोदी सरकारने कोरोनाची चाचणी आणि त्यावरील उपचार हे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील तब्बल 50 कोटी जनतेची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहे. नॅशनल हेल्थ अथॉरिटी म्हणजेच एनएचए यांनी यासंदर्भात माहिती दिली. आज (ता. ०४) केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. आतापर्यंत ३०००च्यावर कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मोठा निर्णय़ घेतला आहे. हा निर्णय नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सध्या देशभरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२५; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

दरम्यान, मागील २४ तासांमध्ये ५२५ करोना रुग्ण भारतात आढळले आहेत. त्यामुळे भारताची रुग्णसंख्या ३०७२ वर जाऊन पोहचली आहे. ३०७२ रुग्णांपैकी २१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २७८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातही आज ४७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली संख्या ३३७ वर गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com