Atal Bihari Vajpayee: ठाकरे कुटूंबिय दिल्लीकडे तर, काॅग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यक्रम रद्द

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटूंबियासह दिल्लीकडे रवाना होणार आहेत. तर, राज्यातील काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षकार्यालयात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

मुंबई: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटूंबियासह दिल्लीकडे रवाना होणार आहेत. तर, राज्यातील काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षकार्यालयात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

काल, रात्रीपासूनच अटलजींच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आज सकाळीच उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह अटलजींच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी दिल्लीला जाण्यासाठी निघाले आहेत.

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांनीही 'एम्स'ला भेट दिली आहे. वाजपेयी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना 'लाईफ सपोर्ट'वर ठेवण्यात आले आहे. 

Web Title: Thackerays family in Delhi and Congress NCPs programs canceled