स्वयंवर जिंका अन् मिळवा मुलीसोबत....

this thailand millionaire offers 2 crore rupees to a man to marry english speaking daughter
this thailand millionaire offers 2 crore rupees to a man to marry english speaking daughter

बँकॉकः थायलंडमधील एका अरबपती उद्योगपतीने त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी स्वयंवराचे आजोयन केले आहे. स्वयंवरादरम्यान एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यासोबत मुलीचा विवाह लावला जाईल. शिवाय, काही कोटी रुपयांबरोबरच व्यवसायही मिळणार आहे. मात्र, यासाठी काही अटी आहेत.

थायलंडचे प्रसिद्ध उद्योगपती आरनॉन रोदथोंग यांचा डूरियन फळाचा व्यापर आहे. डूरियन हे फार जास्त दुर्गंधी येणारं फळ आहे. आरनॉन रोदथोंग हे त्यांच्या कर्णसीता रोडथाँग (वय 26) मुलीसाठी योग्य मुलगा शोधत आहेत. योग्य मुलगा मिळावा यासाठी त्यांनी स्वयंवराचे आयोजन केले आहे. स्वयंवरादरम्यान त्यांनी एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा जिंकणाऱ्या मुलासोबत मुलीचा विवाह लावला जाईल. स्वयंवर जिंकणाऱ्या मुलाला बक्षीस म्हणून 2 कोटी 21 लाख रूपये देणार आहेत. शिवाय, अरबो रूपयांचा व्यवसायही मिळणार आहे. मात्र, त्यासाठी तीन अटी ठेवण्यात आल्या असून, याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली आहे.

आरनॉन यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. सध्या यामधील अर्जाची तपासणी सुरू आहे. मुलांना डूरियन फळाच्या व्यवसायाची किती माहिती आहे हे सुद्धा तपासले जाणार आहे. ही टुर्नामेंट 1 एप्रिल रोजी थायलॅंडमधील पटायामध्ये होणार आहे.

काय आहेत अटी :
1) मुलगा सुंदर असो वा नसो पण सुशिक्षित असावा.
2) मुलगा आळशी नसावा तो मेहनती असायला हवा.
3) मुलाला डूरियन फळाबाबत पूर्ण माहिती असावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com