Bulli Bai तयार करणारा आरोपी म्हणतो, मी जे केलं ते योग्यच केलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News
Bulli Bai तयार करणारा आरोपी म्हणतो, मी जे केलं ते योग्यच केलं

Bulli Bai तयार करणारा आरोपी म्हणतो, मी जे केलं ते योग्यच केलं

मुस्लिम महिलांचा 'लिलाव' करण्यासाठी उजव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी वापरलेल्या 'बुल्ली बाई' (Bulli Bai APP Case) चा मुख्य आरोपी नीरज बिश्नोई (Niraj Bishnoi) याने पोलिस चौकशीदरम्यान आपल्या कृत्याबद्दल आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे. उलट आपल्याला जे योग्य वाटलं तेच आपण केल्याचं आरोपीने सांगितल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

हेही वाचा: Bulli Bai : आरोपींची मोडस ऑपरेंडी काय? पोलिसांनी दिली माहिती

भोपाळमधील एका संस्थेत बी.टेक द्वितीय वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय बिश्नोईला दिल्ली पोलिसांनी आसामच्या जोरहाट जिल्ह्यातून गुरुवारी अटक केली. अधिका-यांनी सांगितलं की, त्यांनी Application तयार करण्यासाठी वापरलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. Microsoft च्या GitHub वर हे अॅप तयार करण्यात आलेलं होतं. नीरजला न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा: Bulli Bai : मुख्य सुत्रधाराला आसामवरून अटक

सूत्रांनी सांगितलं की आसामचा रहिवासी असलेल्या बिश्नोईला त्याच्या ट्विटर हँडलवर पाळत ठेवून 'ट्रॅक' करण्यात आलं होतं. दरम्यान, ते अॅप्लिकेशन आता निलंबित करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत असंही समोर आलं आहे की, हे अॅप नोव्हेंबरमध्ये विकसित करण्यात आलं होतं आणि ते ३१ डिसेंबर रोजी सार्वजनिक करण्यात आलं होतं. त्याच वेळी संदेश पसरवण्यासाठी आणखी एक ट्विटर हँडल @sage0x1 तयार करण्यात आलं. बिश्नोईने @giyu44 हे हँडलही तयार केलं होतं जे त्याने मुंबई पोलिसांची खिल्ली उडवण्यासाठी वापरलं होतं. याच अकाऊंटच्या माध्यमातून त्याने मुंबई पोलिसांचा उल्लेख "स्लंबई पोलिस" असा केला होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime News
loading image
go to top