कार शोरुममधील सेल्समननं केला अपमान; शेतकऱ्यानं शिकवला चांगलाच धडा

कार (Car) खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या सेल्समनला शेतकऱ्याने चांगलाच धडा शिकवला आहे.
Farmer and Salesman
Farmer and Salesman Esakal

कर्नाटकातील (Karnataka) एक शेतकरी कार (Car) घेण्यासाठी कारच्या शोरूममध्ये पोहोचला, मात्र सेल्समनने तुम्ही कार खरेदी करू शकणार नाही, असे सांगून त्यांचा अपमान (Insulted) केला. यावर शेतकऱ्याने त्याला आव्हान दिले आणि तासाभरात पैसे घेऊन शोरूम गाठले. यानंतर सेल्समनला माफी मागावी लागली. ही घटना शुक्रवारी कर्नाटकातील तुमाकुरू येथे घडली. ज्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. (The farmer has taught a good lesson to the salesman who insulted the farmer who went to buy the car.)

Farmer and Salesman
चर्चा तर होणारच! सँडविच शूजवर लोक फिदा; नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

केम्पेगौडा नावाचा शेतकरी बोलेरो पिकअप (Bolero Pickup) खरेदी करण्यासाठी गेला होता, मात्र सेल्समनने त्याला शिवीगाळ आणि दमदाटी करून तेथून जाण्यास सांगितले. कारची किंमत 10 रुपये आहे आणि कदाचित तुझ्या खिशात 10 रुपयेही नसतील, शेतकऱ्याकडे पाहून सेल्समन म्हणाल्याचा आरोप शेतकरी आणि त्याच्या मित्रांनी केला आहे. सेल्समनने त्याच्या दिसण्यामुळे त्याला जाण्यास सांगितले असेही त्यांनी सांगितले.

तिथे वाद सुरू झाला आणि केम्पेगौडा यांनी सेल्समनला आव्हान दिले की जर त्याने तासाभरात पैसे आणले तर त्याला त्याच दिवशी गाडीची डिलिव्हरी करावी लागेल. त्यानंतर तो तासाभरातच रोख पैसे घेऊन परतला. त्यानंतर सेल्स एक्झिक्युटिव्ह आश्चर्यचकित झाला, तथापि, तो कारची डिलिव्हरी करू शकला नाही. कारण सहसा कारची प्रतिक्षा यादी खूप मोठी असते.

Farmer and Salesman
ऑनलाईन लग्न, ऑफलाईन भोजन! अनोख्या लग्नाची चर्चा तर होणारच

यानंतर केम्पेगौडा आणि त्यांच्या मित्रांनी माफीची मागणी केली आणि त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर भांडण मिटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.सेल्स एक्झिक्युटिव्हने अखेर केम्पेगौडा यांची माफी मागितली. शेतकरी म्हणाला, "मला तुमच्या शोरूममधून कार घ्यायची नाही." यानंतर शेतकरी आपले 10 लाख रुपये घेऊन निघून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com